Sunday, 3 September 2017

तु अबोला गं सजणी

कधी तु अबोलाची
सजणी होतेस
कधी तु विरहाची
अर्धागिणी होतेस
अगं वेडे मी तर तुझा
प्रिय सखा तुझ्या मागे
उभा, पण तुच आहेस
की,माझ्याकडे दुर्लक्ष
करीत आहेस.मी तर
तुझ्या प्रतिक्षेत उभा
कायमचा ..तुच आहेस
की माझ्याकडे बघतही
नाहीस.बघ एकदा तु
सखे ...मीच दिसेल
जेव्हा तु नैत्र बंद करशील
तेव्हा माझीच प्रतिमा
समोर दिसेल.
किती वेळ तु मौन
धरशील ,किती वेळ तु
अबोला धरशील,अगं वेडे
सतावु नको ,नाहीतर मी
जाईन आभाळापल्याड...
...............माझी सखी.

तुझा,.......श्री...
*श्रीधर कुलकर्णी*

No comments:

Post a Comment

कितीही पाहीलं तूला तरी.., थोडं अजून पाहायचं  असतं, त्या थोड्याशा पाहण्यात तुला...., डोळे भरून साठवायचं असतं.... रूप तुझे सखी सोज्वळ प...